स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रामध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेची रचना, अभ्यासाचे नियोजन आणि विषयवार तयारी याबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना Previous Year Question Papers, Mock Tests आणि Revision यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच Current Affairs चा नियमित अभ्यास, वेळेचे योग्य व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सराव याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या तयारीसाठी योग्य दिशा देण्यात आली.