विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासामध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या कार्यशाळेमध्ये पालकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सकारात्मक आणि योग्य वातावरण कसे तयार करावे याबाबत मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव न आणता त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करण्याच्या योग्य पद्धती समजावून सांगितल्या जातील. विद्यार्थ्यांच्या आवडी, क्षमता आणि कौशल्ये ओळखून त्यांच्या करिअर निवडीमध्ये योग्य मार्गदर्शन कसे करावे हे सांगितले जाईल. तसेच अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, screen time आणि academic performance यामध्ये संतुलन कसे राखावे याबाबतही उपयुक्त माहिती दिली जाईल.