NEET आणि JEE सारख्या प्रवेश परीक्षांसाठी सुरुवातीपासून योग्य अभ्यासाचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. या मार्गदर्शन सत्रामध्ये विद्यार्थ्यांना Physics, Chemistry, Mathematics आणि Biology या विषयांची तयारी प्रभावीपणे कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले जाईल. Basic Concepts मजबूत करण्यापासून ते MCQs, Previous Year Question Papers आणि Mock Tests च्या सरावापर्यंत विविध तयारीच्या पद्धती समजावून सांगितल्या जातील. विद्यार्थ्यांनी वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, नियमित revision कसे करावे आणि परीक्षेच्या वेळी confidence व accuracy कशी वाढवावी याबाबतही मार्गदर्शन केले जाईल. पालकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी योग्य वातावरण तयार करण्याबाबतही माहिती दिली जाईल.